सिंहासन चित्रपटाची ४४ वर्षे; नाना पाटेकर यांनी सांगितला 'तो' किस्सा | Nana Patekar
७० च्या दशकात गाजलेल्या सिंहासन या मराठी चित्रपटाला ४४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते नाना पाटेकर, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांसह अन्य मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी नाना पाटेकर यांनी सिंहासन चित्रपटाच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.